आम्ही वापरत असलेले बरेचसे जिन्नस आम्ही थेट मालवणहून आणत असल्याने या सर्व खाद्यपदार्थांची योग्य ती अस्सल चव, गुणात्मक दर्जा आणि पोषणमुल्ये सर्वोत्तम ठेवणे आम्हाला शक्य होते...
मी स्वतः थेट सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवणची मूळ रहिवासी असल्याने Authentic Malvani मधले सर्वच्या सर्व शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थही अस्सल मालवणी चवीचे आणि ते पण गुणवत्तेशी कॉम्प्रमाईज न करता मी देऊ शकते.
मालवणी पारंपारीक चव, खाद्यपदार्थांचा व्यवस्थित जोपासलेला ताजेपणा, पदार्थ करण्यासाठी वापरलेल्या साहित्याचा सर्वोत्तम दर्जा, पदार्थ करत असताना ठेवलेली स्वच्छता आणि या सगळ्यांतूनच ग्राहकांचे मिळवायचे पूर्ण समाधान हेच माझे एकमेव लक्ष्य आहे.