ताण-तणावाचे नियोजन आणि उच्चाटन
आजकाल नोकरदार माणसे असोत का व्यावसायीक, महिला असोत का पुरुष, तरुण असो वा वृध्द, सगळ्यांना एकच मोठा जीवघेणा शत्रू समोर दिसत असतो आणि तो म्हणजे ताण आणि तणाव म्हणजेच जीवघेणा स्ट्रेस.
कामाचा अथवा स्पर्धात्मक जगाचा सगळ्यात मोठा न टाळता येण्याजोगा ठेवा म्हणजे स्ट्रेस.
आणि यापासून कुणीही सुटू शकतच नाही…
मग यावर उपाय काय ?
प्राणायाम, योगासने आणि उत्तम दर्जाचे खाणे आणि विशेषतः ओमेगा-3 फॅटी ऍसिडस् असलेले पदार्थ खाणे हा स्ट्रेस आणि यापासून शरीराला भोगायला लावणाऱ्या अनेक व्याधींवर रामबाण उपाय आहे असे वैद्यकशास्त्र सांगते.
ओमेगा-3 फॅटी ऍसिडस् हे जवस , अक्रोड या शाकाहारी पदार्थांत आणि बांगडा, सुरमई या माशांच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात असते.
म्हणूनच आम्ही यावर एक रामबाण उपाय शोधला.
आपल्या सुदैवाने बांगडा आणि सुरमई या माश्यांच्या दोन्ही प्रजाती आपल्या इथे मुबलक प्रमाणात मिळतात आणि विशेष म्हणजे हे दोन्ही चवदार मासे आपल्या इथे मोठ्या प्रमाणात आवडीने खाल्लेही जातात.
आम्ही मालवणी पद्धतीनेच आणि मसाल्यांचाच उपयोग करून पण अजिबात चव अथवा रंगरूपही बदलणार नाही अश्या पद्धतीने बांगडा आणि सुरमई या माश्यांच्या काही रेसिपीज तयार केल्या आहेत.
यामध्ये ऑलिव्ह ऑइल, जवस आणि अक्रोड या ओमेगा-3 फॅटी ऍसिडस मुबलक असणाऱ्या गोष्टींचाही योग्य प्रमाणात वापर केला आहे. तसेच हे मासे आम्ही चुलीवर आणि तेही ऑलिव्ह ऑइलचा वापर करून भाजतो यामुळे हार्ट फ्रेंडली तेलाचाही कंट्रोल्ड वापर केला गेला आहे.
या पद्धतीने आम्ही तयार केलेले हे मासे तुम्हाला मालवणी चव आणि रंगरूप तर देतीलच पण त्यासोबतच सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचा रोजचा ताणतणावही कमी करून हळूहळू याचे समूळ उच्चाटनही करायला मदत करतील.