मी, द शेफ

मी , सौ. गार्गी भट-वेर्लेकर, जन्मापासूनच आहे दस्तुरखुद्द मालवणची.
माझा जन्मही मालवणचा आणि पूर्ण शिक्षणही झाले मालवणलाच.

त्यामुळेच, जरी आता लग्न झाल्यानंतर गेली अनेक वर्षे पुण्यात रहायला आले असले तरी माझ्यावर प्रचंड पगडा आहे अस्सल परंपरागत मालवणी खाद्यसंस्कृतीचा.

मालवणी माणूस हा जातीचा खवय्या आहे. त्याला स्वतःला चांगलचुंगल खायला तर आवडतच पण इतरांना छान छान पदार्थ तयार करून खावू घालायला पण खूप आवडत.

त्यामुळेच असंख्य लज्जतदार मसाल्यांच्या यथायोग्य मिश्रणातून आणि परंपरागत जोपासलेल्या पाकक्रीयेतून मालवणी शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची परंपरागत चव ही मालवणमध्ये पिढ्यानपिढ्या शिजवली जाते , शिकवली जाते आणि जोपासली ही जाते.

याच दर्जेदार मालवणी खाद्यसंस्कृती मध्ये मी लहानाची मोठी झाल्याने हाच मालवणी परंपरागत चवींचा शाकाहारी आणि मांसाहारी असा दुहेरी बहारदार खजिना मी आता तुमच्यासाठी तसाच्या तसा घेऊन येत आहे… Authentic Malvani.Com च्या माध्यमातून.
Top