थोडक्यात महत्वाचे

पाककृती करण्याचे घरगुती स्वरूप 
हॉटेल मध्ये केली गेलेली पाककृती आणि घरच्या गृहिणीने स्वतःच्या घरच्यांसाठीच केलेली पाककृती यांच्या चवीमध्ये आणि गुणात्मक दर्जामध्ये खूप फरक असतो.
गेली अनेक वर्षानुवर्षे ज्या प्रकारे माझ्या कुटुंबियांसाठी मी स्वयंपाक करत आले त्याच प्रकारे मी आता या व्यावसाईक वेंचर मध्येही पाककृती करते आहे आणि त्यामुळे मी जरी कुक असले तरी पाककृती करताना माझी भावना मात्र एका गृहीणीचीच असते.
म्हणूनच माझ्या सर्व जाणकार खवय्या खाद्यप्रेमींना मी क्षुधाशांतीसोबतच सर्वोत्कृष्ट स्वादाची अनुभूती

मी फ्रीज मुळीच वापरत नाही

सर्वच्या सर्व पदार्थ 'फक्त आणि फक्त' 'ताजे आणि ताजेच' करत असल्याने साठवणूक करण्यासाठी मी फ्रीज मुळीच वापरत नाही, 
मला फ्रीज वापरावाच लागत नाही...

शाकाहारी आणि मांसाहारी साठी पूर्णतया वेगवेगळे सेट-अप 
शाकाहारी आणि मांसाहारी अश्या दोन्ही पाककृती मी करत असले तरी या दोन्ही पाककृती करायचे माझे दोन्ही सेट-अप, अगदी पदार्थ शिजवण्यासाठी लागणाऱ्या चुलीपासून ते सर्वच्या सर्व भांड्यांपर्यंत, पूर्णपणे वेगवेगळे आहेत. 
यामुळे शाकाहारी आणि मांसाहारी पाककृतींचा एकमेकांशी 'स्पर्शाचाही' संबंध येत नाही.
उदाहरणार्थ - काळ्या वाटाण्याच्या सांबारासोबत तसेच कोंबडी सागोती सोबत सुद्धा मालवणी तांदळाचे वडे खाल्ले जातात आणि अतोनात स्वादिष्ट ही लागतात.
पण या दोन्ही शाकाहारी आणि मांसाहारी पाककृतींसोबत करावयाचे मालवणी वडे सुद्धा मी वेगवेगळ्या भांड्यांत आणि कढइमध्ये करते.

सर्वोत्कृष्ट तेलाचा उपयोग  
पाककृती करत असताना मी माझ्या ग्राहकांसाठी न करता माझ्या घरच्यानसाठीच करते आहे असे समजूनच मी सर्वच्या सर्व पाककृती करते आणि म्हणूनच मी फक्त हार्ट-हेल्दी तेलांचाच वापर करते.
'खासियत' अंतर्गत करायच्या पाककृतींमध्ये तर मी olive तेलच वापरते.

आवश्वक तेव्हढाच तेलाचा वापर
भरपूर तेलाचा वापर केला की पाककृती खमंग होते असा एक गैरसमज आपल्याकडे आढळतो.
मी वैयक्तिकरीत्या आवश्यक तेव्हढेच तेल वापरूनही पाककृती लज्जतदार करण्यामध्ये विश्वास ठेवते.
यामुळे माझ्या पाककृतींमध्ये तुम्हाला ओघळणारे वारेमाप तेल कधीच आढळणार नाही आणि तरीही माझ्या पाककृती स्वादिष्ट होतात असे माझ्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.

 

Top