निसर्गाने दिलेला एक अनमोल उपहार...
केवळ चवीलाच लज्जतदार नव्हे तर शरीरासाठी सुद्धा आवश्यक असलेले अनेकानेक घटक आयते पुरवणारा एक अदभुत निसर्गाचा अविष्कार म्हणजे मासे….
वेगवेगळ्या जीवनावश्यक प्रथिनांची निसर्गदत्त भरपूर उपलब्धता , ओमेगा ३ fatty acids ची शरीराला आवश्यक मात्रा आणि याचवेळी शरीराला घातक चरबीचे अत्यल्प प्रमाण यामुळे मासे हे आजकालच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या आयुष्यातले एक आवश्यक खाद्य ठरते आहे.
वेगवेगळ्या संस्थांनी केलेल्या पाहणीनुसार वेगवेगळ्या रोगांवर मासे खाण्याचे खालीलप्रमाणे फायदे असू शकतात…
हृदय-विकार - आज सर्वच क्षेत्रांत असलेल्या स्ट्रेसमुळे वाढणारे ट्रायग्लिसराइडस हा मानवाचा एक खूप मोठा शत्रू ठरत आहे. ट्रायग्लिसराइडसच्या वाढलेल्या लेवल्स मुळे रक्तवाहिन्या जाड होतात, रक्तप्रवाह हृदयाकडे जाण्यास अडथळा येतो आणि हृदय विकाराचा अथवा पक्षाघाताचा गंभीर धोका उद्भवू शकतो. माश्यांमध्ये असलेल्या ओमेगा ३ फॅटी ऍसिड मुळे ट्रायग्लिसराइडसच्या वाढलेल्या लेवल्स कमी ठेवण्यास मदत होते.
अल्झायमर - अनेक माशांमध्ये आढळून येणारया polyunsaturated फॅटी ऍसिडसचा उपयोग मानवी मेंदूच्या पेशीचे नुकसान टाळण्यासाठी होऊ शकतो. याच आधारावार ज्यांनी किमान आठवड्यातून एकदा सीफुड खाल्ले आहे अश्या २००० फ्रेंच लोकांचा अभ्यास आणि परीक्षण केलं असता असं आढळून आले की ज्यांनी हे सीफूड अश्याप्रकारे खाल्ले नाही त्यांना सात वर्षांच्या कालावधीत 'वेड' लागण्याचा एक लक्षणीय धोका कमी झाला होता.
उच्च रक्तदाब - मासे खाण्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोकाही कमी होऊ शकतो.
कर्करोग - ३० वर्षांच्या एका स्वीडिश अभ्यासानुसार ज्या माणसांनी अजिबातच मासे खाल्ले नाहीत अश्या माणसांपेक्षा ज्यांनी मध्यम किंवा मोठ्या प्रमाणात मासे खाल्ले अश्यांना प्रोस्टेट कर्करोगाचा धोका तुलनेने फार कमी आहे असे आढळून आले आहे. खेकडे अथवा लॉबस्टर सारख्या शेलफिशमध्ये आढळणाऱ्या सेलेनियम मुळे कर्करोगाशी लढा देणारया शरीरातील पेशी कार्यान्वित झाल्याचेही आढळून आले.
उदासीनता किंवा Depression - माश्यांमध्ये आढळणाऱ्या ओमेगा ३ फॅटी ऍसिड मुळे मानवी मेंदूमधील सेरेटोनीनची पातळी उंचावू शकते आणि यामुळे उदासीनता किंवा Depression चा धोका संभवत नाही अथवा उदासीनतेवर प्रसंगी मातही करता येवू शकते.
संधिवात - मासे खाण्यामुळे संधीवाताचा धोका उद्भवण्याचे प्रमाण नियंत्रणात येऊ शकते.