कसे नी कधी

समजा, तुमच्या घरी एखादा घरगुती कार्यक्रम आहे अथवा एखादी भिशी आहे अथवा मित्रांची एखादी लहान अथवा मोठी पार्टी आहे, ४/५ जणांची अथवा अगदी ४०/५० जणांची….

तर अश्या वेळी तुम्ही खालील कॉम्बिनेशन मागवू शकता Authentic Malvani मधून.

पूर्ण शाकाहारी मेन्यू

काळ्या वाटाण्याचे सांबार , तांदळाचे वडे (पुरया) , कांदा भजी, कैरीचं लोणचं आणि सोलकढी

ही डिश म्हणजे एक सर्वांगसुंदर कॉमबिनेशन आहे.

काळ्या वाटाण्याचे सांबार हे एक झकास आणि एकदम Authentic Malvani आणि महत्वाचे म्हणजे ही एक पूर्णतः शाकाहारी डिश...

कोकणातल्या लग्नासकट कुठल्याही लहान अथवा मोठ्या समारंभांचे, अस्सल मालवणी झणझणीत तरीही स्वादिष्ट अन लज्जतदार पक्वान्न म्हणजेच , "काळ्या वाटाण्याचे सांबार, तांदळाचे वड़े आणि अवीट तृप्तिचि आकंठ भावना स्त्रावणारी पाचक सोलकढ़ी....

"शीरवाळे घाटलं"

तिखट पदार्थ नको असेल आणि निव्वळ भन्नाट सात्विक खाण्याचा पदार्थ हवा आहे तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता एक पूर्णपणे Authentic Malvani पदार्थ , "शीरवाळे घाटलं",

एका विशिष्ठ प्रोसेसने म्हणजेच मालवणी पारंपारीक पद्धतीने केलेल्या तांदळाच्या ताज्या लुसलुशीत शेवया आणि गूळ, वेलची, केशर घालून घोटलेले नारळाचे दूध.....

घावन आणि नारळाचे गोड दुध

"शिरवाळे घाटल" प्रमाणेच एक छान मधुर आणि गुणकारी पदार्थ म्हणजे नारळाच्या मधुर दुधासोबत घेतलेले अस्सल जातिवंत तांदळाचे घावन.

घावन/आंबोळी आणि नारळाची चटणी

कोकणातल्या मालवणचा एक पारंपारीक अस्सल पदार्थ, ब्रेकफास्टला सर्वोत्तम.

मालवण तालुका हा जातिवंत स्थानिक दर्जेदार तांदळासाठी प्रसिद्ध आहे आणि या तांदळाचाच नंतर एक प्रक्रिया करून तयार होतो तो म्हणजे उकडा तांदूळ.
या उकड्या तांदळाचे योग्य प्रमाणात आंबवून बिडाच्या तव्यावर आणि तेही चुलीच्या नैसर्गिक निखाऱ्यावर तयार केल्याने दर्जेदार जाळीदार पदर सुटलेले घावन.

आणि सोबत कोकणातल्याच अस्सल नारळाची हिरवी मिरचीचा मसाला घालून हाताने तयार केलेली चटणी.

उकडीचे मोदक

गणपती बाप्पाला प्रिय असणारा हा सात्विक पदार्थ ज्याला तंतोतंत जमला तो नक्कीच भाग्यवान.

आमचेकडील मोदक हे हातवळणीचे असतात आणि त्यामुळे साच्याच्या मोदकामध्ये जो कृत्रिमपणा जाणवतो तो आमच्या मोदकांत अजिबातच जाणवत नाही.

सोलकढी

कोकणातल्या जुन्या लागवडीच्या डेरेदार राताम्ब्यांच्या फळांपासून तयार केलेल्या आगळामध्ये छान आकंठ बुडवून नंतर यथायोग्य ऊन दिलेल्या कोकमांपासून तयार केलेली दर्जेदार मालवणी सोलकढी हे कुठल्याही जेवणानंतर घ्यावयाचे एक अत्यंत सुंदर पाचक पेय आहे.सोलकढी हे आम्लपित्त नाशक पेय म्हणून हीगुणकारक काम करते.

कुठल्याही जेवणं नंतरचा शेवटचा भात हा या सोलकढीच्या वाटीत एकदा घालून खावून बघाच…

जीव जडेल तुमचा यावर नक्कीच, दावा आहे माझा.

मांसाहारी मेन्यू

तुमच्या घरी पार्टी असेल आणि अश्या वेळी आंबट-तिखट आणि झणझणीत सामिष भोजनाची गरज असेल तेव्हा हे मांसाहारी मेन्यू तुम्ही ऑर्डर करू शकाल.

पार्टीची रंगत तर वाढेलच, तुमचे पाहुणे खुश होतीलच आणि वर आमचे सगळेच मांसाहारी पदार्थ तयार करतानाही आम्ही आवश्यक तेव्हढेच आणि तेही दर्जेदार तेल तसेच ताजा मालच वापरत असल्याने तुमच्या तब्येतीची काळजीही अनायसे घेतली जाते हा वाढीव बोनस.

फ्राय फिश / फ्राय प्रॉन्ज

मालवणी मसाल्यांनी समृद्ध केले गेलेले आणि आवश्यक तेवढ्याच तेलात तयार केले गेलेले फ्राय फिश हे तुम्ही स्टार्टर म्हणूनही नुसते खाऊ शकता.

तेलाची मात्रा खूप कमी प्रमाणात असल्याने हे चविष्ट मासे आपण नुसते सुद्धा खाऊ शकतो आणि आंबट तिखट चवीने समृद्ध असे हे फ्राय फिश तुमच्या पार्टीची रंगत नक्कीच वाढवतील.

फिश करी आणि राईस - मालवणी जेवणाचा सरताज

मस्त छान चुलीवर शिजवलेला कोकणी जातीचा भात (खरतर उकड्या तांदळाचा भात), आंबट आणि हलकी तिखट अशी केली जाणारी मालवणी मसाल्यांतली माश्याची लज्जतदार आमटी, सोबत छान निखाऱ्यावर भाजलेला किंवा कमीतकमी तेलात तळलेला माश्याचा एक तुकडा आणि सोलकढी हे अवीट चवीचे लझीझ जेवण जर मस्त छान संध्याकाळी ८ नंतरच्या पार्टीत असेल तर जी काही रंगत भरेल पार्टीत ती तुम्हीच ठरवू शकता.

कोंबडी सागोती वडे

अस्सल मालवणी कोंबडी सागोती आणि तांदळाचे वडे म्हणजे मालवणी जेवणाच्या चाहत्यांचे जबरदस्त आकर्षण.

ताज्या लुसलुशीत कोंबडीची कमी तेलाचा आणि योग्य त्या परंपरागत मसाल्यांचा वापर करून केली गेलेली सागोती (मालवणी पद्धतीने तयार केलेली बोनलेस कोंबडी) , घरगुती पद्धतीने प्रक्रिया केलेल