सोशल

माझे अहो, श्री. मिलिंद वेर्लेकर, याने १९९९ साली झालेल्या कारगिल युद्धावर हे पुस्तक लिहिले होते.

या पुस्तकाच्या मराठीमध्ये पब्लिश झाल्यावर लगेचच ६ महिन्यांमध्ये ५ आवृत्या निघाल्या.

कुठलाही व्यायासायिक दृष्टीकोन न ठेवता जवळपास २५० पानांच्या या ऐतिहासिक संदर्भ ग्रंथाचे मूल्य केवळ ५०/- रुपये इतके नगण्य ठेवल्याने तब्बल २५,००० वर पुस्तकांचा विक्रमी खपही झाला.

हे पुस्तक नंतर हिंदी, गुजराती, इंग्रजी आणि संस्कृत भाषेमध्ये भाषांतरीतही झाले.

याच पुस्तकाच्या शेवटी कारगिल युद्धात शहीद झालेल्या तब्बल ३८९ शहिदांची यादी मिलिंदने दिली होती.

याच यादीचा आधार घेवून आज भारतातले आणि परदेशातलही अनेक भारतीय या देशासाठी प्राणांचे हौतात्म्य देणारया नरवीरांच्या कुटुंबीयांना जमेल तेवढी मदत थेट पाठवत असतात.

गेल्या तब्बल १४ वर्षांपासून आम्ही वेर्लेकर कुटुंबीय या ना त्या स्वरूपात या शहिदांच्या कुटुंबियांना आर्थिक अथवा वस्तुरूपी मदत करत आहोत.

आता additionally, माझ्या या Authentic Malvani च्या दर महिन्याच्या फायद्यातून, या कारगिल शहिदांच्या १० मुलांना शैक्षणीक मदत करायचे मी वैयक्तीकरीत्या ठरवले आहे.

माझ्या या उद्योगाच्या माध्यमातून समाजामधून जो काही फायदा मी कमावते त्याचा काही भाग दर महिना समाजासाठीच खर्च करावा आणि समाजाचे देणे द्यावे अशी माझी ठाम धारणा आहे.

Top