नमस्कार,
मी, गार्गी-भट वेर्लेकर ,
Authentic Malvani , ही माझी वैयक्तिक प्रतिबद्धता आहे, वचन आहे.
जाणकार खवय्यांना अस्सल, पारंपारीक तरीही लज्जतदार आणि पौष्टिक मालवणी सुग्रास भोजन देण्याची माझी प्रतिबद्धता.
कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले समुद्र किनाऱ्यावर वसलेले निसर्गरम्य मालवण म्हणजे अनेकानेक लाजवाब शाकाहारी तसेच मांसाहारी वैशिष्ट्यपूर्ण पाककृतींचे आगार.
अमृतमयी स्वादाच्या शिरवाळे-घाटले अथवा सोलकढी सारख्या शाकाहारी पदार्थांचे अथवा समुद्री माश्यांच्या तसेच कोंबडी-वडे सागोती सारख्या विविध स्वादिष्ट आणि लज्जतदार मांसाहारी खाद्यप्रकारांचे आद्य-माहेरघर.
मालवणला पारंपारीक घरगुती मसाल्यांच्या वापरातून घरोघरी मासे केले जात असल्याने माश्याच्या मसाल्यांची अस्सल परंपरा इथे पिढीजात चालत आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे या एकाच पद्धतीच्या पिढीजात चालत आलेल्या शिजवण्याच्या प्रक्रियेमुळे इथल्या माश्यांच्या विलक्षण चवीमध्ये कधीच बदल होत नाही. याच अस्सल मालवणी विश्वसनीय आणि पारंपारीक घरगुती मसाल्यांच्या लाजवाब मिश्रणाने योग्य प्रकारे आणि योग्य प्रक्रियेने शिजवलेले
आमच्या Authentic Malvani मधले मासेच काय पण इतरही अस्सल मालवणी शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थ जिभेवर रेंगाळणारया चवीचा अनुभव तुम्हाला देतील.
पारंपारीक घरगुती मसाल्यांची आणि विशिष्ट प्रक्रियेने अन्न शिजवण्याची हीच अस्सल मालवणी परंपरा आम्ही तुमच्यासाठी आता घेवून आलो आहोत.
मालवणी पदार्थ करण्यासाठीचे नारळापासून ते अगदी पारंपारीकरीत्या तयार केलेले मालवणी घरगुती मसाले सुद्धा आम्ही थेट मालवण वरूनच आणतो आणि त्यामुळेच अस्सल रांगडी आणि दर्जेदार मालवणी चव आम्ही खात्रीशीरपणे देऊ शकतो.