हृदय-मित्र मासे

जर आपण हृदयरोगी असाल,

आपल्या घरात आपल्या आई-वडलांना अथवा जवळच्या नातेवाईकांना हृदयविकार असेल,

आपणास उच्च रक्तदाब असेल,

आपले Cholesterol, triglycerides आवश्यकते पेक्षा खूप जास्त असेल,

आणि यामुळेच हृदयविकाराच्या झटक्याची अथवा मेंदूमध्ये रक्ताची गुठळी होवून ब्रेन-स्ट्रोक होण्याची आपणास काळजी वाटत असेल तर…….

तर.......

आपण एका आठवड्यात किमान दोन एक वेळा मासे खावून आपली ही जोखीम बहुधा कमी करू शकता.

माशांमध्ये अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस् असतात जे तुमच्या शरीराला फार उपयुक्त ठरू शकतात.

आणि मुख्य फायदेशीर आणि माशांमधला सर्वात उपयुक्त घटक म्हणजे ओमेगा-3 फॅटी ऍसिडस्, जे तुमचे कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लीसराइड्स जाणवण्याइतपत कमी करू शकतात,

तुमचा उच्च रक्तदाब ताब्यात ठेवू शकते,

तुमच्या हृदयाची अनियमित धडधड थांबवू शकते,

तसेच तुमच्या रक्तात गुठळ्या होवू देत नाहीत.

आणि यामुळेच हृदयविकार आणि ब्रेन-स्ट्रोकसुद्धा दूर सहजपणे दूर ठेवला जाऊ शकते असे आधुनिक वैद्यकशास्त्र सांगते.

यांसोबतच मासे खाण्याचे मुलांच्या शिकण्याच्या क्षमतेमध्येही लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते आहे.

Top